लहानपण देगा देवा संत तुकाराम महाराज सुविचार - sant tukaram maharaj suvichar

Sant Tukaram Maharaj Suvichar Best Lines Quotes Thoughts – सर्वश्रेष्ठ संत तुकाराम महाराज सुविचार

Sant Tukaram Maharaj Suvichar Best Lines Quotes Thoughts – सर्वश्रेष्ठ संत तुकाराम महाराज सुविचार

संत तुकाराम हे १७ व्या शतकातील एक वारकरी संत होते. त्यांचा जन्म वसंत पंचमीला-माघ शुद्ध पंचमीला झाला. पंढरपूरचा विठ्ठल वा विठोबा हे तुकारामांचे आराध्यदैवत होते. तुकारामांना वारकरी ‘जगद्‌गुरु ‘ म्हणून ओळखतात. वारकरी संप्रदायातल्या प्रवचन व कीर्तनाच्या शेवटी – ‘ पुंडलीक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय’ असा जयघोष करतात.

मन करा रे प्रसन्न ।
सर्व सिद्धीचे कारण ।

खरा ज्ञानी
लोकांना तारतो.

दुर्जनांचा मान मुळीच ठेऊ नये.
उलट पद्धतशीरपणे अवमान करावा

ठेविले अनंती तैसेचि राहावे ।
चित्ती असुद्या समाधान

लहानपण देगा देवा ।
मुंगी साखरेचा रवा ।।

बोले तैसा चाले ।
त्याची वंदावी पाऊले ।।

धर्माच्या नावाखाली
अधर्म चालु असतो.

प्रस्थापित पढिक विद्वान हे
ज्ञानाचे आंधळे भारवाहक आहेत

सत्य आणि असत्याचा शोध घेणाऱ्यांनी
आपल्या मनाचा कौल मानावा.

Sant Tukaram Maharaj Suvichar Best Lines Quotes Thoughts – सर्वश्रेष्ठ संत तुकाराम महाराज सुविचार

बहुमत चुकीचे असल्यास
कधीही स्वीकारू नये

जया अंगी मोठेपण
तया यातना कठीण

सुख पाहता जवापाडे ।
दुःख पर्वताएवढे ।।

दया, क्षमा, शांती ।
तेथे देवाची वस्ती ।।

चांगले मित्र
हेच भाग्याचं लक्षण

शुध्द बीजापोटी ।
फळे रसाळ गोमटी ।।

साधु-संत येती घरा ।
तोचि दिवाळी दसरा ।

जे जाणुनबुजून चुकत असतील
त्यांची फजिती करा.

अनाथ अपंगाची
सेवा करा.

माणसाने थोडातरी
परोपकार करावा.

आपण चंदन असल्याची घोषणा
चंदनाला करावी लागत नाही

तुम्ही मुलाबाळांसाठी खुप काही करता.
पण गोरगरिबांसाठी देखील तसच करत चला

अज्ञानाच्या पोटी,
अवघीच फजिती


हे पण वाचा : संत गाडगेबाबा यांचे विचार


आणखी मराठी सुविचार वाचण्यासाठी क्लीक करा.👇👇👇


कृपया :- मित्रांनो हे चांगले विचार पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…