maitri jokes marathi

150+ मैत्री जोक्स मराठी – Maitri jokes in marathi

friends jokes in marathi

📌 Jokes (41)

✍️
पहिला: का रे..? बराच आनंदी दिसतोय? आणि कपडे का असे खराब झालेत?
दुसरा: बायकोला माहेरी पाठवायला रेल्वे – स्टेशनवर गेलो होतो…
पहिला: अरे हो.. पण कपडे का असे खराब झालेत?
दुसरा: गाडी लवकर सोडावी म्हणुन इंजिन ड्राईव्हरला कडकडुन मिठी मारली ..!
😍😂😍

📌 Jokes (42)

✍️
बंड्या : अयायायाया… आज बाबांनी ज्याम धुतला रे.
खंड्या : का बुवा?
बंड्या : मी तर त्यांना फक्त एवढंच म्हटलं, ‘कमिने’
खंड्या : ऑ?
बंड्या : अरे मी म्हटलं. कमिने हा सिनेमा पहायला येता का हो बाबा.
😍😂😍

📌 Jokes (43)

✍️
बबडी : ए बंड्या… बंड्या. तू ना असा काय आरशासमोर बसून अभ्यास करतोयस?
बंड्या : त्याचं काय अॅ ना. म्हणजे त्याचे खूप फायदे असतात.
बबडी : अय्या, ते रे कशे?
बंड्या : अगं बबडे, सिंपल. एक म्हणजे तू आणि आरशातल्या तू मिळून अभ्यास केला की, उजळणी करायला लागत नाही. अभ्यासाला कंपनी मिळते. एकमेकांना डाऊट विचारता येतात आणि मग समोरच्यालाही सेम डाऊट आहे हे पाहून टेन्शन येत नाही ना.
😍😂😍

📌 Jokes (44)

✍️
डिगरी तर आपल्याला कोणत्याही काँलेज मध्ये मिळेल…
मात्र ज्ञान आपल्याला चौकात मित्रांमध्ये उभे राहुनच मिळेल
😍😂😍

📌 Jokes (45)

✍️
पूर्वी लोक कमी आजारी पडत
मुख्य कारण म्हणजे
आधी लोक जेवण घरी करत आणि संडासला बाहेर जात.
आता लोक संडासला घरात आणि जेवायला बाहेर जातात
😍😂😍

📌 Jokes (46)

✍️
Height of killer marathi pj
पेशंट: डॉक्टर अलीकडे झोप नाही येत
डॉक्टर: मग सलीम कडे झोप
😍😂😍

📌 Jokes (47)

✍️
एकदा शाळेत बाई मित्रावर निबंध लिहायला सांगतात…
.
.
पण ते पण इंग्लिश मध्येच..
.
.
.
.
आपला झंप्या उभा राहतो
.
.
आणि बाईना म्हणतो :- “बाई….’फुकनीच्या’ ला इंग्लिश शब्द काय आहे हो..??”
😍😂😍

📌 Jokes (48)

✍️
जर घरात घुसताना वरांड्यात एखादी नाजुक लेडीज चप्पल दिसली,
तर,
कोणताही माणुस, डोक्यावरचे केस सावरल्या शिवाय आत जात नाही…
संस्कार हो…. आणखी काय 😀 .
😍😂😍

📌 Jokes (49)

✍️
बॉयफ्रेंड – हाय डार्लिंग.. कुठे आहेस?
गर्लफ्रेंड – अरे पुण्याला आलीये..
फिनिक्स मॉल मधे,
एक ब्लू जिन्स पाहिली आहे २००० ची,
घेते आता मस्त आहे, तू कुठे आहेस?
बॉयफ्रेंड – मी इथं इस्लामपुरात गांधी चौकात तुझ्या मागे उभा आहे,
आता अर्धा तास भांडून सुद्धा तो दूकानदार ती 200 ची जिन्स 150 ला देत नसेल तर,
त्याला माझे नाव सांग…
मित्र आहे तो आपला..
😍😂😍

📌 Jokes (50)

✍️
असा कोणता “तारा”आहे जो….
जमिनीवर रहातो
आणि
काही दिवसात…
आकाशात जातो…???
.
.
.
.
म्हातारा 😀
😍😂😍

mitra sathi jokes मैत्री जोक्स

📌 Jokes (51)

✍️
परिक्षा पास झाल्यावर् :
आई : देवाची कृपा.
सर : माझ्या मेहनतीमूळे.
बाबा : मुलगा कोणाचा आहे
मित्र : चल एक बीयर मारु.
पण ~
नापास झाल्यावर्~~
सर : वर्गात लक्ष नाही.
आई :मोबाईलचा परिणाम.
बाबा : आईचे लाड.
मित्र : चल एक बीयर मारु.
सगळे बदलतात पण मित्र बदलत नाहीत
😍😂😍

📌 Jokes (52)

✍️
मित्रा कर्कोटका,
मी तुला आता ह्या फोनवर भडकून
बोलणा-यांचा
आवाज लगेच खाली आणण्याचं एक
गुह्य शास्त्र सांगतो. त्यानी तिकडे
भडकून मोठ्याने आवाज चढवला की आपण इथनं फक्त,
प्लीज जरा
मोठ्याने बोलता का? असं म्हणायचं
की तो आऊट. दोन वाक्यात आवाज
खाली येतो की नाही बघ.”
😍😂😍

📌 Jokes (53)

✍️
आभार मानण्याचे काहीच कारण नाही..?
बस गच्च भरली होती. आता ती सुरु होणार तोच
ड्रायव्हरम्हणाला, “गाडीचा टायर पंक्चर आहे”
ताबडतोब कंडक्टर उतरला. त्याच्या मागोमाग गण्या उतरला, दोघांनी मिळून गाडीचा टायर बदलला, बस सुरु होण्यासाठी सज्ज झाली.
कंडक्टर गण्याला म्हणाला, “मी तुम्ही केलेल्या मदती बद्दली तुमचा आभारी आहे.
आजकाल लोक एस.टी.वाल्यांना अजिबात
मदत करीत नाहीत, पण साहेब तुम्ही स्वतः गाडीखाली जाऊन
टायर चढवला. हातपाय , कपडे खराब करून घेतलेत.
मी खरच खूप आभारी आहे.
गण्या म्हणाला,” मित्रा, आभार मानण्याचे काहीच कारण नाही . माझी बायको १० वर्षा नंतर माहेरी जातेय, ती याच बस मध्ये आहे, टायर पंक्चर झाल्या मुळे माहेरी जाण तीच
रद्द होऊ नये म्हणून केली हि सगळी खटपट.
😍😂😍

📌 Jokes (54)

✍️
झंप्या आणि गंप्या बॉर्डरवर जातात. झंप्या अंगावर मच्छरदाणी घेतो.
गंप्या : अरे, हे काय? बुलेटप्रूफ जॅकेटएवजी हे रे काय घातलेस?
झंप्या : अरे यार, डोन्ट वरी..ज्यातून एक डास आत घुसू शकत नाही, त्यातून गोळी कशी आत शिरणार रे!
😍😂😍

📌 Jokes (55)

✍️
गंपू: आधी कोंबडी की आधी अंडे?
झंपू: कोणती ऑर्डर आधी दिलीये?
😍😂😍

📌 Jokes (56)

✍️
बंड्या : तुला सांगतो जर मी एका श्रीमंत मुलीशी लग्न केलं ना तर माझे सगळे प्रॉब्लेम संपतील.
खंड्या : अरे मग लगेच करून टाक की.
बंड्या : पण एक प्रॉब्लेम आहे यार.
खंड्या : अरे त्यात काय? अशा कितीतरी मुली तयार होतील की.
बंड्या : हो… मुली तयार होतील रे. पण माझी बायको नाही ना तयार होणार.
😍😂😍

📌 Jokes (57)

✍️
दोन शिष्ट मैत्रिणी बोलत असतात.
पहिली : तुझी हेअरस्टाइल खूप छान आहे.
दुसरी : धन्यवाद.
पहिली : ही स्टाइल बदलू नको. ती परत येईल.
😍😂😍

📌 Jokes (58)

✍️
तीन मित्र एका एका हॉटेलमध्ये ७५ व्या मजल्यावरच्या खोलीत राहात असतात. लिफ्ट बंद असल्याने जिन्याने चढणे कंटाळवाणे होऊ नये म्हणून ते ठरवतात की, पहिले २५ मजले चढेपर्यंत एकाने जोक्स सांगायचे. त्यापुढचे २५ मजले चढेपर्यंत दुसऱ्याने गाणी म्हणायची आणि त्यापुढचे २५ मजले चढेपर्यंत तिसऱ्याने वाईट बातम्या सांगायच्या. पहिल्याचे जोक ऐकत ते २५ मजले चढतात. दुसऱ्याची गाणी ऐकत पुढचे २५ मजले चढतात. ५१ व्या मजल्यावर आल्यावर तिसरा म्हणतो, पहिली वाईट बातमी ही आहे की मी खोलीच्या चाव्या गाडीत विसरलोय!
😍😂😍

📌 Jokes (59)

✍️
चिंटू : मला वाटतं, ती आपल्या वर्गातली नवीन आलेली मुलगी बहिरी असावी.
बंटू : अरेरे बिच्चारी.
चिंटू : होना रे. मला पण वाईट वाटलं जेव्हा कळलं तेव्हा.
बंटू : तुला कसं रे कळलं.
चिंटू : अरे मी तिला म्हटलं… आय लव्ह यू… तर त्यावर तिने उत्तर दिलं, माझी चप्पल करकरीत नवीन आहे.
😍😂😍

mitra nu jokes मैत्री जोक्स

📌 Jokes (60)

✍️
प्रपोज करण्याची नवीन पद्धत.
मिकू : तुझं नाव गूगल आहे का?
चिंकी : नाही ..का?
मिकू : मी जे जे शोधत होतो ते सगळं तुझ्यात आहे म्हणून विचारलं….
😍😂😍

📌 Jokes (61)

✍️
एका मंदिरा समोर एक गाय , एक म्हैस आणि एक रेडा चरत होते ….
मंदिरा मधुन बाहेर येणारे काही लोक गाईला हात लावून नमस्कार करून पुढे जात होते ….
ते पाहून म्हैस रेड्याला म्हणाली,
गाईला सगळे हात लावतात पण मला का रे कोणी हात लावत नाही ..????
रेडा म्हणाला : ओऽऽऽऽ मॅडम….
तुमचा हिरो इथे असताना तुम्हाला हात लावायची हिम्मत आहे का कोणाच्यात..??
😍😂😍

📌 Jokes (62)

✍️
दिवसाला सूर्याची साथ आहे,….
वाह..वाह….
रात्री ला चंद्राची साथ आहे..
वाह..वाह….
समुद्राला लाटांची साथ आहे,
वाह..वाह…………..
.
.
.
.
.
पाणी उकळून प्या
सगळी कडे,
‘डेंगूची’ साथ आहे.
😍😂😍

📌 Jokes (63)

✍️
बरं झालं या जगात “श्रीमंती” ही पैशानेच मोजली जातीय,
जर मनाने, प्रेमाने मोजली गेली असती तर
माझे नाव ही कदाचीत स्वीस बँक खातेदारांच्या लिस्ट मध्ये असतं
😍😂😍