maitri jokes marathi

150+ मैत्री जोक्स मराठी – Maitri jokes in marathi

navin marathi jokes facebook,

📌 Jokes (21)

✍️
१ पुणेरी मुलगा: काय रे, भारी swimming करतोस! कुठे शिकलास??
दुसरा मुलगा:पाण्यात!!!
😍😂😍

📌 Jokes (22)

✍️
सोहन- मोहन तुझ्या घरी कपडे धूवायला मोलकरीण होती ना,
मग तू कसा काय आज कपडे धुअत आहे?
मोहन- कारण त्या मोलकरणीशी मी लग्न केलं आहे.
😍😂😍

📌 Jokes (23)

✍️
दिनेश: तुझ्या छत्रीस दोन भोके पडली आहेत.
मानव : मला ठाऊक आहे रे, मीच पाडली आहेत ती.
दिनेश : का रे?
मानव : अरे, त्यामुळे मला पाऊस थांबल्याचे कळते तरी.
😍😂😍

📌 Jokes (24)

✍️
गण्या : अरे मित्रा ” अरेंज मॅरेज ” म्हणजे काय ?
बंड्या : सोप्प आहे रे , समज… तू रस्त्यावरून चालला आहेस आणी अचानक तुला नागीण चावते ..
गण्या : ठीक आहे …आणी ” लव मॅरेज ” म्हणजे काय ?
बंड्या : लव मॅरेज ” म्हणजे तू त्या नागीण कडे जातो आणी तीला बोलतो ” फूस फूस … चाव ना मला ..चाव
😍😂😍

📌 Jokes (25)

✍️
गंपू:- किती मुश्कील आहे यार टीचर शी प्रेम
करणे
झंम्पू-: का रे.?
गंपू :- अरे २५ पानांचे प्रेम पत्र लिहिले तर
वेडीने
Assignment समजून खाली sign
केली आणि वरून
कॉमेंट पण लिहिली कि अक्षर सुधरावे,
शुद्धलेखनाच्या चुका सुधाराव्यात आणि चक्क
पैकी ७ मार्क पण दिलेत.
😍😂😍

📌 Jokes (26)

✍️
रामू – ए राजू, तुला मी एका सेकंदात अख्खे गाणे म्हणून दाखवू?
राजू – शक्यच नाही, चल म्हणून दाखव पाहू.
रामू – गा S S णे!
राजू – अरे वा! चल, मीसुद्धा तुला फटाका न फोडता अगदी तुझ्या दोन्ही कानांजवळ फटाक्याचा मोठा आवाज काढून दाखवतो.
रामू – दाखव की…त्याचे बोलणे पूर्ण होण्याआधीच राजू त्याच्या कानांखाली पेटवतो
फाट…. फाट…
😍😂😍

📌 Jokes (27)

✍️
झंप्या : ए पंप्या, एवढा घाबराघुबरा का झालायस बुवा तू?
पंप्या : अरे, थोडं कन्फ्युजन झालं यार.
झंप्या : म्हणजे?
पंप्या : अरे मी रस्त्यावरून चाललो असताना मला समोर काहीतरी दिसलं. मला वाटलं की साप आहे. पण नेमकी ती काठी होती.
झंप्या : हात्तिच्या…एवढंच ना.
पंप्या : हो रे…पण मग त्या सापाला मारण्यासाठी म्हणून मी जी काठी उचलली ना, तो खरा साप निघाला.
😍😂😍

📌 Jokes (28)

✍️
रमण – माझ्या प्रेमिकेच्या अवास्तव मागण्या ऐकून तिला सोडण्याचा निर्णय घेतला.
चंपू – ठिक आहे. पण, तिची अशी मागणी तरी काय होती.
रमन – दूसरे लग्न करण्याची
😍😂😍

📌 Jokes (29)

✍️
पोरगी पोरग्याला,
“तुझी स्माइल काय गजब हायं..दात कशे चमकुन रायले इतके ?
पोरगं लाजून बोलतो-माझ्या गायछाप मधे मीठ हाय..
😍😂😍

📌 Jokes (30)

✍️
प्रेमाच्या “क्रिकेट” मध्ये “प्रपोज” नावाचा”बॉल”टाकला..
.
मुलीची “विकेट” पडणार इतक्यात,,
.
मुलीचा बाप “नो बॉल” म्हणाला आणि ,,
.
.
मुलीचा मोठ्या भावाने “फ्री हिट”चा फायदा घेऊन चोप चोप चोपला !
😍😂😍

📌 Jokes (31)

✍️
सबको बता दो
आज मै बहुत खुश हूँ
.
.
.
.
क्योंकी
.
.
.
.
.
मागच्या वर्षाचे हिवाळ्याचे जॅकेट काढले
त्यात 20 रूपये सापडले
😍😂😍

navin marathi jokes images

📌 Jokes (32)

✍️
रशियन:-आमच्याकडे लग्नात जेवायला चांदीची ताटे असतात.
अमेरिकन:-आमच्याकडे सोन्याची !
भारतीय:-आमच्याकडे एकदा जेवलेकी ताटच फेकून देतात!
“पत्रावळी”!!!
😍😂😍

📌 Jokes (33)

✍️
चंपूराव : अहो गंपूराव मी असं ऐकलंय की विवाहित स्त्रीया स्वर्गात गेल्यावर त्यांना आपापले पती मिळतात म्हणून.
गंपूराव : हं.. असं मीही ऐकलंय खरं.
चंपूराव : असं. मग, विवाहित पुरुष गेल्यावर त्यांना काय मिळतं?
गंपूराव : अहो, हिशेब साधा आहे. त्यांना आपापल्या पत्नी तिथे मिळतील. का हो असं का विचारताय?
चंपूराव : अरेरे. मग, मरून पण काही उपयोग नाही. हेच खरं
😍😂😍

📌 Jokes (34)

✍️
बंडोपंत : अग्ग आगं… मला अशी लाटण्याने मारू नको… कॉय झालंय ते तर सांग..
ठमाकाकू : मी मुक्त स्त्री आहे आणि बदचलनी नवऱ्याचं वर्तन गप्प राहून अजिबात सहन करणार नाही.
बंडोपंत : अगं पण माझा गुन्हा काय ते तर सांग.
ठमाकाकू : तुमची सगळी थेरं कळतात मला. तुम्हाला इंग्लिश बोलणाऱ्या नटवीचे डोहाळे लागलेत हे काय कळतं नाही होय मला?
बंडोपंत : अगं पण…
ठमाकाकू : मग काय तर. त्यादिवशी तुम्हाला उशीर झाला म्हणून तुमच्या मोबाईलवर फोन लावला… तर कोणी सटवीनेच उचलला फोन आणि यॅयॅयॅयॅ करून इंग्लिशमध्ये म्हणाली.. ‘पर्सन यू आर कॉलिंग इज करंटली बिझी!!???’
😍😂😍

📌 Jokes (35)

✍️
सुरेश : नरेश, समजा तुझ्याकडे पाच घरे आहेत. त्यातल मला एक देशिल कां ?
नरेश : हो, देईन ना .
सुरेश : समजा तुझ्याकडे पाच पॅंट्स आहेत त्यातली मला एक देशिल कां ?
नरेश : हो. का नाही.
सुरेश : समजा तुझ्याकडे पाच हजार रुपये आहेत. मला एक हजार देशिल ?
नरेश : नाही.
सुरेश : का नाही ?
नरेश : माझ्याकडे खरच पाच हजार रुपये आहेत !!!
😍😂😍

📌 Jokes (36)

✍️
अमित :- मला फोन वर धमक्या मिळत आहेत.
पोलिस :- कोण आहे जो धमक्या देत आहे ?
अमित :- फोन वाले बोलत आहेत, जर बील नाही भरल तर कापुन टाकेन.
😍😂😍

📌 Jokes (37)

✍️
एक मित्र : माझी बायको परी आहे!
दुसरा मित्र : नशीबवान आहेस, माझी बायको अजून जिवंत आहे.
😍😂😍

📌 Jokes (38)

✍️
एक मित्र : व्हॅलेंटाइन डेला काय करणार?
दुसरा मित्र : दिवसभर गर्लफ्रेण्डचा हात हातात घेऊन बसणार… नाही तर ती शॉपिंग करत बसेल.
😍😂😍

📌 Jokes (39)

✍️
(एकदा दिनू आणि विनू रस्त्यावरून जात असतात, त्या दोघांकडे मोबाईल असतात.) दिनू विनूला म्हणाला, ‘‘आपल्या दोघांकडे मोबाईल आहे. तरी आता आपण पूर्वीच्या माणसांसारखे कबुतरांद्वारे ‘मेसेज’ पाठवू.’’
विनू म्हणाला, ‘‘चालेल.’’ (असे काही दिवस जातात. एक दिवस विनू दिनूला कोरी चिठ्ठी पाठवतो. नंतर दिनू विनूला फोन करतो.)
दिनू : ‘‘अरे, तू मला कोरी चिठ्ठी का पाठवलीस ?’’
विनू : ‘‘मी तुला ‘मिस कॉल दिला.’’
😍😂😍

📌 Jokes (40)

✍️
मुलगी : माझ्या आईमुळे माझे बाबा करोडपती झाले.
मैत्रीण : व्वा! कसे काय?
मुलगी : आधी ते अब्जपती होते.
😍😂😍