भूतकाळात जे घडले Chanakya quotes in marathi

चाणक्यचे १३ सर्वोत्तम प्रेरणादायी मराठी विचार – Chanakya quotes in marathi

Chanakya quotes in marathi – चाणक्यचे १३ सर्वोत्तम प्रेरणादायी मराठी विचार 

भूतकाळात जे घडले त्यामुळे दु:खी होऊ नका.

चिंता आणि बेचैनी सोडून वर्तमानकाळाचा सदुपयोग,

भविष्य सावरण्यासाठी केला पाहिजे…

**************

नियती म्हणजे केवळ योगायोग नाही,

ती प्रत्येक व्यक्तीला अडचणीतून बाहेर पडण्यासाठी

अनेक पर्याय तयार करून ठेवत असते..

बुद्धीमान मनुष्य त्या पर्यायांना ओळखून

त्यातून योग्य पर्याय निवडतो.

सर्व काही नशिबाच्या हवाली टाकून बसणारा मनुष्य

सदैव दु:ख आणि कष्ट भोगत असतो.

असे लोक जीवनात काहीही करू शकत नाहीत…

**************

लग्नानंतर जोपर्यंत पतीकडे पैसा असतो,

तो सर्व सुख-सुविधा प्रदान करतो

तोपर्यंत पत्नी त्याची सर्व प्रकारे काळजी घेते.

परंतु दुर्दैवाने पतीचा पैसा नष्ट झाला आणि

सुख-संपत्ती संपून गेल्यानंतर पत्नीची खरी पारख होते…

या काळातच समजते की,

पत्नीचे प्रेम पतीवर होते की त्याच्या पैशावर!

**************

परमेश्वराने आपल्याला Chanakya quotes in marathi

परमेश्वराने आपल्याला दोन डोळे,

दोन कान दिले आहेत,

मात्र जीभ एकच आहे.

याचा अर्थ आपण जास्तीत जास्त पाहावे, ऐकावे

मात्र बोलावे मोजकेच…

**************

ज्याचा खर्च उत्पन्नापेक्षा जास्त आहे

असा व्यक्ती गरीब असतो.

ज्या व्यक्तीजवळ फक्त पैसा आहे,

त्याच्यापेक्षा जास्त गरीब दुसरा कोणीही नाही…

**************

ज्या व्यक्तीला पैशाचा Chanakya quotes in marathi

ज्या व्यक्तीला पैशाचा हव्यास आहे त्याला पैसा देऊन,

अहंकारी व्यक्तीला हात जोडून,

मुर्खाची गोष्ट मान्य करून आणि

विद्वानाला सत्य बोलून वश करता येऊ शकते…

**************

ज्या लोकांचा स्वभाव आवश्यकतेपेक्षा,

जास्त साधा-सरळ, आणि सहज असतो,

त्यांना आयुष्यात अडचणींचा सामना करावा लागतो…

धूर्त आणि लोभी लोक यांच्या स्वभावाचा गैरफायदा घेऊ शकतात.

अशा लोकांना दुर्बल समजले जाते.

अनावश्यक स्वरुपात या लोकांना प्रताडना सहन करावी लागते.

**************

ज्या गोष्टी घडून गेल्या तो भूतकाळ झाला.

भूतकाळातल्या गोष्टी पुन्हा येत नसतात.

गेलेला काळ चांगला होता की वाईट?

गेलेला काळ गेला, तो आता बदलता येणे शक्य नाही.

त्यामुळे झालेल्या गोष्टींबद्दल पश्चाताप करून दु:खी होऊ नका…

**************

चाणक्यचे १३ सर्वोत्तम प्रेरणादायी मराठी विचार – Chanakya quotes in marathi

जो माणूस भूतकाळातल्या गोष्टी आठवून,

चिंता करीत बसतो तो कधीही सुखी होऊ शकत नाही.

झालेल्या गोष्टींविषयी चिंता करून काहीही लाभ नाही..

भूतकाळात आपण जे चांगले किंवा वाईट कर्म केले असेल,

त्यापासून धडा घेऊन आपण पुढे जात राहिले पाहिजे.

आपल्या हातून ज्या वाईट गोष्टी घडल्या त्या पुन्हा होणार नाहीत

यासाठी दक्ष राहिले पाहिजे…

**************

जे लोक पैशाचा जास्त मोह Chanakya quotes in marathi

जे लोक पैशाचा जास्त मोह करतात,

ते जीवनात कधीही सुखी राहू शकत नाहीत…

या लोकांना प्रत्येक गोष्टीमध्ये फक्त पैसाच दिसतो

पहिला पैसा कमावण्याची चिंता आणि नंतर त्याला सांभाळण्याची चिंता

पैसा जास्त झाल्यानंतर व्यक्तीला तो चोरीला जाईल

याची नेहमी भीती वाटत राहते…

**************

जर तुम्ही स्वतःला तुच्छ,

निर्धन, क्षुद्र मानत असाल

तर तुम्ही तसेच व्हाल.

याउलट स्वतःचा आदर करत असाल

तर आत्मनिर्भर व्हाल आणि यश प्राप्त कराल…

**************

चालू असलेला वर्तमानकाळ

नाजूक आहे असे मानणे म्हणजे,

आयुष्यातील सर्वात मोठा भ्रम आहे.

आयुष्यातील प्रत्येक क्षण सर्वोत्तम आहे

असे मानणारा व्यक्ती सुखी राहू शकतो…

**************

क्रोध मूर्खपणापासून सुरु Chanakya quotes in marathi

क्रोध मूर्खपणापासून सुरु होऊन

पश्चातापावर नष्ट होतो.

जो व्यक्ती स्वतःच्या क्रोधावर

नियंत्रण ठेवतो त्याला यश प्राप्त होते…


If you like these images please share on your Facebook Whatsapp Twitter to inspire other people.


आणखी मराठी सुविचार वाचण्यासाठी क्लीक करा.👇👇👇


कृपया :- मित्रांनो हे चांगले विचार पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…