थोडक्यात उत्तर - अकबर बीरबल ची गोष्ट - Akbar Birbal chi Goshta marathi

थोडक्यात उत्तर – अकबर बीरबल ची गोष्ट – Akbar Birbal chi Goshta marathi

थोडक्यात उत्तर – अकबर बीरबल ची गोष्ट – Akbar Birbal chi Goshta marathi

एक दिवस, बिरबल बागेत फिरत असताना सकाळच्या ताज्या हवेचा आनंद घेत होता की अचानक एक माणूस त्याच्या जवळ येऊन बोलला ‘तुम्ही मला सांगू शकता की बिरबल कुठे मिळेल?’ ‘बागेत.’ बिरबल बोलला.

तो माणूस काहीवेळ थांबला आणि बिरबलला बोलला ‘तो कुठे राहतो?’ ‘त्याच्या घरात.’ बिरबलने जोरात उत्तर दिले.

तो माणूस अजून काही वेळ थांबला. थोडा वैतागून त्याने पुन्हा विचारले ‘तुम्ही मला त्याचा पूर्ण पत्ता का देत नाही?’

✍🏻 हे पण 🙏👇 वाचा

प्रत्येक भारतीयांच्या मनातील अंतराळ परी कल्पना चावला यांची माहिती मराठी

‘कारण तुम्ही मला त्याचा पूर्ण पत्ता विचारलाच नाही?’ बिरबलने आणखी जोरात उत्तर दिले.

‘तुम्हाला लक्षात येत नाही का, मी काय विचारू इच्छित आहे ते?’ त्या माणसाने पुन्हा प्रश्न केला.

‘नाही.’ बिरबलने उत्तर दिले.

तो माणूस काही वेळ शांत राहिला, बिरबलचे फिरणे चालूच होते. त्या माणसाने विचार केला की, मी असे विचारले पाहिजे की तू बिरबलला ओळखतो का? तो माणूस पुन्हा बिरबलच्या जवळ गेला आणि बोलला ‘बस, मला तू फक्त इतके सांग की तू बिरबलला ओळखतो का?’

‘हो, मी ओळखतो.’ बिरबल उत्तरला.

‘तुझे नाव काय आहे?’ त्या माणसाने विचारले.

‘बिरबल.’ बिरबलने उत्तर दिले.

✍🏻 हे पण 🙏👇 वाचा

राजा बिरबल यांची माहिती यांचे जीवन

तो माणूस चकित झाला. तो बिरबललाच इतक्या वेळापासून बिरबलचा पत्ता विचारत होता आणि बिरबल होता की जो स्वतःहून स्वतःबद्दल सांगत नव्हता की तो बिरबल आहे. त्याच्यासाठी ही आश्चर्याची गोष्ट होती.

‘तू किती मजेदार माणूस आहेस!’ असे बोलत तो माणूस काहीसा त्रासदायक दिसत होता, ‘मी तुला तुझ्याबद्दलच विचारत होतो, आणि तू काहीतरी वेगळेच सांगत होतास’ सांग, तू असे का बरे केले?

‘मी फक्त तू विचारलेल्या प्रश्नांची सरळ सरळ उत्तरे दिली.’ बिरबल बोलला.

बिरबलची हुशारी आणि चातुर्य बघून त्या माणसाला हसू आले. तो माणूस म्हणाला ‘त्याला त्याच्या काही घरगुती समस्या सोडविण्यासाठी बिरबलची मदत घ्यायची होती’ त्यावर बिरबलने मदतीसाठी होकार दिला. “


ह्या मराठी कथा वाचा

एका शहरात एक आजी संत्री विकायला बसायची

देवाचा मित्र मराठी कथा


आणखी मराठी सुविचार वाचण्यासाठी क्लीक करा.👇👇👇


कृपया :- मित्रांनो अकबर बीरबल ची गोष्ट – Akbar Birbal chi Goshta marathi ह्या मराठी कथा पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…