Aarti Sangrah Lyrics In Marathi

संपूर्ण मराठी आरती संग्रह | Aarti Sangrah Lyrics In Marathi

संपूर्ण मराठी आरती संग्रह | Aarti Sangrah Lyrics In Marathi

“आरती” म्हणजे प्रार्थना. आरत्या ह्या देवाकडे साकडे किंवा स्तुति मागण्यासाठी म्हणल्या जातात. आरत्यांचे फार मोठे महत्त्व हिंदू धर्मात सांगितले आहे. आज तुमच्यासाठी संपूर्ण आरती संग्रह घेऊन आलो आहे. हे सगळे आरती क्रमाने लावले आहेत या क्रमाने तुम्ही आरती घेऊ शकता. (Aarti Sangrah Lyrics In Marathi)

श्री गणपती देवाची आरती (Ganpati Aarti)

✍️
सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची |
नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची |
सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची |
कंठी झळके माळ मुक्ताफळाची || १ ||
🍃

✍️
जय देव जय देव जय मंगलमूर्ती |
दर्शनमात्रे मनकामना पुरती ||
रत्नखचित फरा तूज गौरीकुमरा |
चंदनाची उटी कुंकुमकेशरा |
हिरे जडित मुकुट शोभतो बरा |
रुणझुणती नुपुरे चरणी घागरिया || 2 ||
🍃

✍️
लंबोदर पितांबर फनी वरवंदना |
सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना |
दास रामाचा वाट पाहे सदना |
संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवंदना |
जय देव जय देव जय मंगलमूर्ती |
दर्शनमात्रे मनकामना पुरती || ३ ||
🍃

हे पण वाचा : मराठी मध्ये प्रसिद्ध लोकांविषयी माहिती

शंकराची आरती (Shankarachi Aarti)

✍️
लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा।
वीषें कंठी काळा त्रिनेत्रीं ज्वाळां।।
लावण्यसुंदर मस्तकीं बाळा।
तेथुनियां जळ निर्मळ वाहे झुळझुळां ।।1।।
जय देव जय देव जय श्रीशंकरा।।
आरती ओवाळूं तुज कर्पुगौरा ।।ध्रु.।।
🍃

✍️
कर्पुगौरा भोळा नयनीं विशाळा।
आर्धांगीं पार्वती सुमनांच्या माळा।
विभुतीचें उधळण शितिकंठ नीळा।
ऐसा शंकर शोभे उमावेल्हाळा ।। जय. ।।2।।
🍃

✍️
देवी दैत्यीं सागरमंथन पैं केलें।
त्यामाजी जें अवचित हळाहळ उठिलें।
तें त्वां असुरपषं प्राशन केलें।
नीळकंठ नाम प्रसिद्ध झालें।। जय. ।।3।।
🍃

✍️
व्याघ्रांबर फणिवरधर सुंदर मदनारी।
पंचानन मनमोहन मुनिजनसुखकारी।
शतकोटीचें बीज वाचे उच्चारी।
रघुकुलतिलक रामदासा अंतरी।।
जय देव जय देव जय श्रीशंकरा।।4।।
✒️

देवीची आरती – दुर्गे आरती ( Durga Aarti)

✍️
दुर्गे दुर्घट भारी तुजविण संसारी।
अनाथ नाथे अंबे करुणा विस्तारी।
वारी वारी जन्म मरणांते वारी।
हारी पडलो आता संकट निवारी॥१॥
🍃

✍️
जय देवी जय देवी महिषा सुरमथिनी।
सुरवर ईश्र्वर वरदे तारक संजीवनी॥धृ॥
🍃

✍️
तुजवीण भुवनी पाहता तुज ऐसे नाही।
चारी श्रमले परंतु न बोलवे काही।
साही श्रमले परंतु न बोलवे काही।
साही विवाद करिता पडले प्रवाही।
ते तू भक्तालागी पावसी लवलाही॥२॥
🍃

✍️
प्रसन्न वदने प्रसन्न होती निजदासा।
क्लेशांपासूनी सोडवी तोडी भवपाशा।
अंबे तुजवाचून कोण पुरवील आशा।
नरहरी तल्लीन झाला पदपंकजलेशा॥३॥
🍃

श्री महालक्ष्मीची आरती (Mahalaxmi Aarti )

✍️
जय देवी जय देवी जय महालक्ष्मी
वससी व्यापकरूपे राहे निश्चलरूपे तू स्थूलसुक्ष्मी. जय.
🍃

✍️
करवीरपूर वासिनी सुरवर मुनिमाता
पुरहर वरदायिनी मुरहर प्रियकांता
कमलाकारे जठरी जन्मविला धाता
सहस्त्र वदनी भूधर नपुरे गुणगाता. जय.
🍃

✍️
मातुल्लिंग गदा खेटक रविकिरणी
झळके हाटकवाटी पीयुष रसपाणि
माणिक रसना सुरंग वसना मृगनयनी
शशीकर वदना राजस मदनाची जननी. जय.
🍃

✍️
तारा शक्ती अगम्या शीवभजका गौरी
सांख्य म्हणती प्रकृती निर्गुण निर्धारी
गायत्री नीजबीजा निगमागमसारी
प्रगटे पद्मावती निजधर्माचारी. जय.
🍃

✍️
अमृत भरिते सरिते अघदुरिते वारी
मारी दुर्घट असुरा भवदुस्तर तारी
वारी माया पटल प्रणमत परिवारी
हे रूप चिद्रुप दावी निर्धारी. जय.
🍃

✍️
चतुराननाने कुश्चित कर्मांच्या ओळी
लिहिल्या असतिल माते माझे निजभाळी
पुसोनि चरणातळी पदसुमने क्षाळी
मुक्तेश्वर नागर क्षीरसागर बाळी. जय.
🍃

उर्वरित आरती पुढील पानावर वाचा…