Vitthalachi aarti lyrics

“युगे अठ्ठावीस” विठोबाची आरती – Vithoba chi aarti Marathi

“युगे अठ्ठावीस” विठोबाची आरती – Vithoba chi aarti Marathi

महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाचे सर्वोच्च देवता तसेच जनक प्रभु विठ्ठल पांडुरंग असुन त्यांनी इतर वारकरी संप्रदाय या वैश्विक संप्रदायाची स्थापना इ.सन.1192 मध्ये केली.

युगे अठ्ठावीस विटेवरी ऊभा” विठोबाची आरती (Vithoba chi aarti Lyrics)

॥ युगे अठ्ठावीस आरती ॥

✍️
युगे अठ्ठावीस विटेवरी ऊभा ।
वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा ।
पुंडलिकाचे भेटी परब्रह्म आलें गा ।
चरणी वाहे भीमा उद्धारी जगा ।। 1।।
जय देव जय देव जय पांडुरंगा ।
रखुमाईवल्लभा राईच्या वल्लभा पावे जिवलगा ।।धृ. ।।
🍃

✍️
तुळसी माळा गळा कर ठेवुनी कटी ।
कांसे पीतांबर कस्तुरी लल्लाटी ।
देव सुरवर नित्य येती भेटी ।
गरूड हनुमंत पुढे उभे राहती ।।
जय देव ।। 2।।
🍃

✍️
धन्य वेणुनाद अनुक्षेत्रपाळा ।
सुवर्णाची कमळे वनमाळा गळा ।
राई रखुमाबाई राणीया सकळा ।
ओवळिती राजा विठोबा सावळा।।
जय देव ।।3।।
🍃

✍️
ओवाळू आरत्या कुर्वड्या येती ।
चंद्रभागेमाजी सोडुनिया देती ।
दिंड्या पताका वैष्णव नाचती ।
पंढरीचा महिमा वर्णावा किती ।।
जय देव ।।4।।
🍃

✍️
आषाढी कार्तिकी भक्तजन येती ।
चंद्रभागेमध्ये स्नान जे करिती ।
दर्शनहेळामात्रे तया होय मुक्ति ।
केशवासी नामदेव भावे ओवाळिती ।। ५ ।।
– संत नामदेव
🍃

श्री विठ्ठल आरती २

✍️
येई हो विठ्ठले माझे माऊली ये ।
निढळावरी कर ठेवुनि वाट मी पाहे ।।धृ ।।
🍃

✍️
आलिया गेलिया हाती धाडी निरोप ।
पंढरपूरी आहे माझा मायबाप् ।। १ ।।
🍃

✍️
पिवळा पीतांबर् कैसा गगनी झळकला ।
गरुडांवरि बैसोनि माझा कैवारी आला ।। २ ।।
🍃

✍️
विठोबाचे राज्य आम्हां नित्य दिपवाळी ।
विष्णुदास नामा जीवेभावे ओंवाळी ।। ३ ।।
-संत नामदेव
🍃

श्री विठ्ठल आरती ३

✍️
ओवाळूं ग माये विठ्ठल सबाह्य साजिरा ।
राईरखुमाबाई सत्यभामेच्या वरा ।। धृ ।।
🍃

✍️
कनकाचे पर्येळी उजळोनी आरती ।
रत्नदीपशोभा कैशा प्रकाशल्या ज्योती ।। ओवाळूं ।। १ ।।
🍃

✍️
मंडित चतुर्भुज कानीं शोभत कुंडले ।
श्रीमुखाची शोभा पाहतां तेज फांकले ।। ओवाळू || २ ||
🍃

✍️
वैजयंती माळ गळा शोभे स्यमंत । शङ्खचक्रगदापद्म आयुर्धे शोभत ।। ओवाळूं ||३||
सांवळा सुंदर जैसा कर्दळीचा गाभा ।
🍃

✍️
चरणीईची नूपुर वांक्या गाजती नभा ।। ओवाळू ॥ ४ ॥
ओवाळीता मन माझें ठाकलें ठायी। समाधिस्थसमान तुकया लागला पायी ।। ओवाळूं ॥५॥
-संत नामदेव
🍃

हे पण वाचा :

श्री हनुमान चालीसा
संपूर्ण मराठी आरती संग्रह
शुभं करोति कल्याणम आरोग्यं
40+ धूम्रपानविरोधी घोषवाक्य मराठी
30+ मुलगी वाचवा मराठी घोषवाक्य
30+ रस्ता सुरक्षा मराठी घोषवाक्य
मराठी मध्ये प्रसिद्ध लोकांविषयी माहिती

Tags : युगे अठ्ठावीस विटेवरी उभा आरती, विठ्ठलाची आरती मराठी, आरती पांडुरंगाची, शंकराची आरती, Vitthal aarti marathi, विठ्ठल रुक्माई ची आरती, Vitthalachi aarti lyrics,