Woman Jokes in Marathi स्त्रीचे ओले केस – Marathi Jokes – मराठी जोक्स 🤣🤣
पोस्ट अश्लिल नाही😜
“स्त्रीचे ओले केस आणि लोकतंत्र”
एक सेमिनार मध्ये पोलिटिकल सायन्सचा एक माजी विद्यार्थी किस्सा सांगत होता:
झालं असं की लहानपणी उन्हाळ्याच्या सुट्टीत एका सायंकाळी वडील त्यांच्या चार मुलांशी बोलत होते,
“😊 उद्या आपण बाहेरगावी जायचं आहे. दोन ऑप्शन्स आहेत. तुमच्या आत्याकड जायचं किंवा तुमच्या मामाकडे जायचं. बहुमताने जे ठरेल तिथं उद्या जाऊया.”
मुलांची आई म्हणाली,
“मुलांच्या मामाकडे जायचं आहे.”
मुलं एकसूरात म्हणाली,
“आत्याकड जायचं..!”
हे पण 🙏 वाचा 👉: सर्वश्रेष्ट संत समर्थ रामदास स्वामी यांची माहिती
बाबा म्हणाले,
“ठीक 👍. बहुमत झालं. तुमच्या आत्याकडे जाऊ.”
😍 आत्याकडे जायची, तिथं काय काय मज्जा करायची यांची स्वप्नं रंगवत मुलं झोपी गेली.
🤩 सकाळी उठून पटापट तयार झाली.
दुसऱ्या दिवशी सकाळी मुलांची आई 💃 न्हाणीघरातून स्वतःचे लांबसडक ओले केस टॉवेलने झाडत, गालातल्या गालात हंसत बाहेर आली आणि म्हणाली,
“बाळांनो 😘, पटापट नाष्टा करून घ्या. आपल्याला मामाकडे जायचं आहे..!”
😳 मुलांनी अविश्वसनीय नजरेनं बाबांकडे पाहिलं. ते गपचूप आणि लक्षपूर्वक वर्तमानपत्र वाचण्याचा अभिनय करत होते..!😒
बास…! 😔 त्यादिवशी उमजलं की लोकतंत्रात बहुमताचा आदर, मताचा मान वगैरे सगळं बकवास आहे..! खरा निर्णय तर बंद खोलीत त्यावेळेस होतो ज्यावेळेस गरीब आणि निःसहाय जनता झोपी गेलेली असते…!!!
😂😂
*********🤣🤣🤣👇👇👇
दुचाकीस्वार स्त्री असो वा पुरुष, हेल्मेट सक्तीचीच….
ही बातमी वाचून….बायकोने कपाट उघडले आणि म्हणाली
बायको : “अरे देवा… ! आता या सगळ्या साड्यांवर मॅचिंग हेल्मेट घ्यायची?”
हे ऐकल्यावर नवरा घाईघाईने बाहेर निघाला.
बायको: “आहो! कुठे? हेल्मेट घ्यायला मीही बरोबर येते.”
नवरा: “मी हेल्मेट घ्यायला नाही, आपली Activa विकायला चाललोय.” 😂😂😂😂😂😂😂
हे पण 🙏 वाचा 👉: सचिन तेंदुलकर यांचे 37 सर्वश्रेष्ठ मराठी सुविचार
*********🤣🤣🤣👇👇👇
ते दोघे एकमेकांना शिव्या देत होते 😲😲😲
.
.
.
मग मी तिथे गेलो, त्यांना समजावले 😌😌
.
.
.
.
तेव्हा कुठे मारामारी चालू झाली
🤪🤪🤪😝😝😝😂😂😂
आणखी मराठी जोक्स वाचण्यासाठी क्लीक करा.👇👇👇
आणखी मराठी जोक्स वाचण्यासाठी क्लीक करा.👇👇👇
कृपया :- मित्रांनो हे (Boss Staff Marathi Jokes) मराठी जोक्स पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓🙏💓