१०० सुविचार मराठीमध्ये - 100 Suvichar in Marathi

१००+ सुविचार मराठीमध्ये – 100+ Suvichar in Marathi

Life Suvichar (63)
आपल्याला शंभर लोक पोसणे
शक्य नसल्यास तर फक्त
एका व्यक्तिस आहार द्या.

Life Suvichar (64)
आयुष्यात नशीबाचा भाग फ़क्त एक टक्का आणि
परिश्रमाचा भाग नव्याण्णव टक्के असतो.

Life Suvichar (65)
आयुष्यात भावनेपेक्षा
कर्तव्य मोठे असते.

✍🏻 हे पण 🙏👇 वाचा

प्रत्येक भारतीयांच्या मनातील अंतराळ परी कल्पना चावला यांची माहिती मराठी

Life Suvichar (66)
आयुष्यात मला भावलेलं एक गुज सांगतो.
उपजिविकेसाठी आवश्यक असणाऱ्या विषयाचं शिक्षण जरुर घ्या.
पोटापाण्याचा उद्योग जिद्दीनं करा,
पण एवढ्यावरच थांबू नका.
साहित्य, चित्र, संगीत, नाट्य, शिल्प, खेळ ह्यांतल्या एखाद्या तरी कलेशी मैत्री जमवा.
पोटापाण्याचा उद्योग तुम्हाला जगवील,
पण कलेशी जमलेली मैत्री
तुम्ही का जगायचं हे सांगून जाईल.

Life Suvichar (67)
आयुष्यातल्या कोणत्याही क्षणी
क्रोधाचे गुलाम बनू नका.

Life Suvichar (68)
आर्थिक हानी, मनातील दु:ख, पत्नीचे चारित्र्य, नीच माणसाने सांगितलेल्या गोष्टी,
एखाद्याने केलेला अपमान या गोष्टी
कधीही कोणालाही सांगू नका,
यातच शहाणपण आहे.

Life Suvichar (69)
आळसाचा प्रवास इतका सावकाश असतो की
दारिद्र्य त्यास ताबडतोब गाठते.

Life Suvichar (70)
आळसात आरंभी सुख वाटते,
पण त्याचा शेवट दु:खात होतो.

Life Suvichar (71)
आळसाला तुम्ही आजचा दिवस बहाल केलात की
तुमचा उद्याचा दिवस
त्याने चोरलाच म्हणून समजा.

Life Suvichar (72)
आशा म्हणजे मानवी जीवनाचा
मुख्य आधार होय.

✍🏻 हे सुविचार पण 🙏👇 वाचा

आई मराठी सुविचार

Life Suvichar (73)
इतरांच्या सेवेत स्वतःला समर्पित करा.
तुमचा ‘स्व’ तुम्हाला सापडेल.

Life Suvichar (74)
उदात्त दु:ख हेच
क्षुद्र दु:खावरचं या जगातलं
उत्कृष्ट औषध आहे.

Marathi Suvichar (75)
जीवनात एकदा एखादा निर्णय घेतला तर
मागे वळून पाहू नका,
कारण माघार घेणारे कधीच इतिहास रचत नाही.

Marathi Suvichar (76)
दुःखामध्ये सुद्धा हसत रहावं
वेळ तर सर्वांचीच येते,
झालं तर आयुष्यच सोन व्हावं
राख तर सर्वांचीच होते.

✍🏻 हे सुविचार पण 🙏👇 वाचा

कोट्स मराठीमध्ये

Marathi Suvichar (77)
जी लोक न सांगता तुम्हाला ओळखतात
ते तुमच्या खुप जवळचे असतात,
अशी माणसं खूप नशिबाने मिळतात.

Marathi Suvichar (78)
काटेरी झाडावरील थेंबांनी
एवढं मात्र सांगितलं आहे,
पानांनी साथ सोडली म्हणून काय झाल
निसर्गाने तुला मोत्यांनी सजवलयं.

Marathi Suvichar (79)
मत्सर केल्याने जीवन बदलत नसत,
तर चांगल्या कर्मानी ते बदलतं.

Marathi Suvichar (80)
सगळ्यात सुंदर नातं हे दोन डोळ्यांचं असत..
कारण एकाच वेळी ते उघडझाप करतात,
एकाच वेळी रडतात आणि एकाच वेळी झोपतात
ते ही आयुष्यभर एकमेकांना न बघता.

पुढील पानावर सुविचार वाचा